
Utkarsh Shikshak Award – Raigad District
रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या सामाजिक कार्याची व उत्तम शैक्षणिक कामाची दखल घेऊन एस आर दळवी (आय) फाऊंडेशन यांच्या वतीने शिक्षकांना ‘उत्कर्ष शिक्षक पुरस्कार 2022’ प्रदान करणे हा पुरस्कार सोहळा रविवारी दिनांक 27 नोव्हेंबर २०२२ रोजी पालीतील मराठा समाज सभागृहात अत्यंत दिमागदार पद्धतीने संपन्न झाला .
या सोहळ्यासाठी एस.आर. दळवी (आय) फाउंडेशनचे संस्थापक मा श्री रामचंद्र दळवी, (आबा सर )सौ .सीता दळवी मॅडम, माननीय प्राध्यापक सौ पुराणिक मॅडम, पोलीस उपनिरीक्षक गणेश गुंड, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष एडवोकेट मा.श्री.धनंजय धारप त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थितीत होते. अत्यंत नियोजनबद्ध आणि आखीव-रेखीव असा हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला .या सोहळ्यासाठी रायगड जिल्ह्यातून जवळपास ३०० शिक्षक उपस्थित होते. रायगड येथे झालेल्या आपल्या या कार्यक्रमाची बातमी वृत्तपत्रात तसेच वृत्तवाहिनी वर प्रसारित झाली आहे.
Recent Comments