S R Dalvi (I) Foundation

Home Events Utkarsh Shikshak Award – Ratnagiri District

Utkarsh Shikshak Award – Ratnagiri District

🏆 <<<उत्कर्ष शिक्षक पुरस्कार 2022 – सस्नेह आमंत्रण>>>🏆

आदरणीय शिक्षक/ शिक्षिका,

आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, आपण केलेल्या सर्व सामाजिक कार्याची आणि उत्तम शैक्षणिक कामाची दखल घेऊन शिक्षकांचा सन्मान, कौतुक आणि समाजाप्रती करत असलेल्या कामगिरीसाठी एस आर दळवी (आय) फाऊंडेशन यांच्या वतीने,
येत्या
रविवारी १२ फेब्रुवारी २०२३ रोजी, सकाळी ठीक ११ वाजता,
‘उत्कर्ष शिक्षक पुरस्कार २०२२’ पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन
माध्यमिक शाळा सेवक पतपेढी, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे करण्यात आलेले आहे.

* पुरस्कार सोहळ्यास येणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी Aditya Birla यांच्यातर्फे ‘Financial Literacy’ या विषयावर प्रशिक्षण तसेच त्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, नेहरू सायन्स सेंटर,द्वारे पूर्ण झालेल्या ‘डिजिटल लिटरसी’ कोर्सचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

सर्व शिक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे.

प्रमुख पाहुणे:
* मा.श्री. मोहित कुमार सैनी (जिल्हा युवा अधिकारी, रत्नागिरी)
* मा. श्रीमती. जयश्री तानाजी गायकवाड (Additional Superintendent of Police, Ratnagiri)
* मा.श्री. संतोष कोलते (Co-Ordinator of the MKCL (Information Technology), संस्थापक- कोलते कॉम्प्युटर,रत्नागिरी)

सन्माननीय पाहुणे: माननीय श्री. रामचंद्र दळवी व मान. सौ. सीता दळवी – संस्थापक, एस. आर. दळवी (आय) फाऊंडेशन

उत्कर्ष पुरस्कार सोहळ्यासाठी आमच्या फाउंडेशन तर्फे तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण.

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.🙏

Scroll to Top