National Unity Day
भारतात 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल, एक प्रख्यात राजकीय नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान ज्यांनी एक मजबूत आणि अखंड भारत निर्माण करण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. त्यामुळेच भारत सरकारने 2014 मध्ये 31 ऑक्टोंबर म्हणजेच सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जन्मदिवसाला राष्ट्रीय एकता दिवस म्हणून घोषित केला. प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोंबरला मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा दिवस साजरा करण्यात येतो.
सरदार पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोंबर 1875 रोजी गुजरात मधील नाडियाद येथे झाला होता. आपले वडील झावेर भाई आणि आई लाडबा पटेल यांचे ते चौथे पुत्र होते.सरदार वल्लभ भाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. त्यांनी भारताला एकजुट करण्यासाठी महत्वाची भूमिका साकारली होती. खरंतर गृहमंत्र्यांच्या रुपात त्यांचे प्रथम काम हे देशातील रियारत या भारतात आणणे हे होते. या कामासाठी त्यांनी आपले रक्त सुद्धा मातृभुमिसाठी सांडले आहे. भारतातील एकीकरण मध्ये आपले योगदान दिल्याने त्यांना लोह पुरुषाची उपमा दिली गेली. देशातील 562 लहान-मोठ्या रियासती भारतीय संघात विलीन करण्यासाठी त्यांना भारतात एकता निर्माण करण्यासाठी त्यांनी फार मोलाचे कार्य केले.
सरदार वल्लभ भाई पटेल यांनी भारताच्या संविधानाला आकार देण्याच्या कार्यात ही आपली महत्वाची भुमिका पार पाडली. त्यांनी 24 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेद्वारे गठित करण्यात आलेल्या सल्लागार समितीचे नेतृत्व सुद्धा केले होते. समितीचे दायिक्त मौलिक आणि अल्पसंख्यांक अधिकारांवर एक अंतरिम रिपोर्ट सुद्धा तयार केला होता.
दरम्यान, सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवसाच्या सोहळ्याचे आयोजन राजधानी दिल्लीत केले जाते. या दिवशी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त जागृकता वाढवण्यासाठी आणि सरदार पटेल यांच्या आठवणीत ‘रन फॉर युनिटी’ चे आयोजन केले जाते. या राष्ट्रव्यापी मॅरेथॉनचे आयोजन देशातील विविध शहरात, गावात आणि जिल्ह्यात केले जाते.