I want to be very clever?
आजच्या पिढीची हीच समस्या आहे की, झटपट यश पाहिजे पण यशाला कोणताही आडमार्ग नाही. त्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. त्यासाठी अभ्यासाचं वेळच योग्य नियोजन करा त्याची तंतोतंत पालन करा.तुमच्या मध्ये हळूहळू बदल होईल. तुम्हाला जर वेगवेगळ्या विषयात हुशारी वाढवायची आहे. तर ती उत्तम बाब आहे. यासाठी तुम्हाला स्वतःला सतत वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवून ठेवावं लागतं. असं केलं की मेंदूतल्या न्यूरॉन्स पेशींना चालना मिळते. हुशार होण्यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्याव्या लागतील. हुशार होण्यासाठी काय कराल ?
बुद्धी वाढण्यासाठी तिचा वापर जास्तीत जास्त व्हायला हवा, बुद्धी वापरली तर वाढते, हा बुद्धीबाबतचा नियम अवश्य लक्षात ठेवावा. आपण एखाद्या विषयाचा जेवढा अभ्यास करू, तेवढी आपली त्या विषयातली बुद्धी वाढत असते. पक्ष्यांच्या सहवासात असणारे निरीक्षणाने पक्ष्यांची बोलीसुद्धा बोलू शकतात. तसेच, शास्त्रीय संगीताचा तासनतास सराव करणारे त्या विषयात पारंगत होतात. भाजी विकायला आई बाबांना मदत करणारी छोटी मुलं बघितली आहेस ना? पटापट बेरजा वजाबाक्या करतात. एकाच वेळी दोघा-तिघांशी व्यवहार करू शकतात. हे कशामुळे तर सराव मिळाल्यामुळे । सरावामुळे बुद्धी वाढते.
आपल्याला भाषांमध्ये हुशार व्हायचं असेल, तर त्या भाषा जास्तीत जास्त ऐक. त्या भाषेत बोल, वाचन कर. ती भाषा सरावाची होते, भाषा सरावाची झाली की त्या भाषेत चांगलं लिहिता-बोलता येतं..गणितातलं कौशल्य वाढवायचं असेल तर पुस्तकातली गणितं तर सोडवच, त्याबरोबर वरच्या इयत्तांच्या पुस्तकातील गणिताची उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न कर. तन्हेतऱ्हेची भाषिक आणि गणिती कोडी सोडव,
आपल्याला ज्यात हुशार व्हायचं आहे, त्या क्षेत्रातले जास्तीत जास्त अनुभव आपल्या बुद्धीला देणं आवश्यक आहे. म्हणजे बुद्धी चमकदार बनते. समजा तुला शास्त्रज्ञ व्हायचं आहे तर विज्ञानाशी संबंधित विविध विषयांवर वाचन वाढवायला हवं. विज्ञाननिष्ठ लेखन वाढवायला हवं. प्रत्यक्ष प्रयोग करून बघणं, त्या प्रयोगांचे विश्लेषण करणं, ते नोंदवून ठेवणं अशा पद्धतीनं आपण आपल्या बुद्धीला वळण लावू शकतो. तसंच इतिहास, भूगोल आणि पर्यावरण या विषयांच्या बाबतीतही आहे. केवळ पुस्तकातील धडे वाचून बुद्धी वाढत नाही. आपण जेथे राहतो त्याचा इतिहास, भूगोल, पर्यावरण माहिती करून घ्यायला हवं. हा अभ्यास इतर शहरं, राज्य, देश असा वाढवता येतो. अशा प्रकारे आपल्याकडच्या माहितीचा साठा वाढत जातो.