The father-daughter bond is unbreakable…
आजच्या प्रवासातील ही गोष्ट मला तुम्हाला सांगावी वाटत आहे. एक वयोवृद्ध माणूस माझ्या शेजारी बसले होते व गप्पा मारत होते त्यांचे वय अंदाजे ८० असेल . त्यांच्यासोबत बोलताना असे समजले की ते त्यांच्या मुलीला भेटायला मुंबईला येत होते. गावी राहत असल्यामुळे ते जरासे घाबरले होते, मुंबई शहराशी त्यांची ओळख नव्हती. त्यात कर्नाटक ते मुंबई हा प्रवास या वयात ते करणे तसे अवघडच आहे, पण मुलीच्या भेटीची ओढ वडिलांना कधीच थांबवू शकत नाही. त्यांच्या गप्पांमध्ये फक्त त्यांच्या मुलीचा उल्लेख ते करत होते, तिचे बालपण कसे गेले, तिला कसे मोठे केले, शिकवले , तिचे लग्न, तिची मुलं बाळ, तिचा संसार, तिच्यावर असेलेले प्रेम. एक वेगळंच नातं एक वेगळीच ओढ बाप लेकीच्या नात्यात असते.
खर तर हे नात म्हणजे घरपण होय.हसत खेळत घर हवं असेल तर प्रत्येक घरात एक तरी मुलगी हवीच. बापाला मनमोकळ कवाड खुल करण्यास देवाने दिलेली ही खूप सुंदर देण होय. शिस्त लावणार, चुकांकडे दुर्लक्ष करणार, प्रत्येक वेळी हो हो तुझच बरोबर म्हणणार, आई विरूद्ध मुलीची बाजू मांडणार व तिला आई पेक्षा मोठेपणा देणार नातं म्हणजे बाप. कधीकधी वाटतं हक्क काय असतो आणि तो कसा गाजवावा हे सहज सिद्ध करणार न्यायालय म्हणजे बाप. माझ्या साठी हे करून आण अस हक्कान सांगणारा नातं म्हणजे बाप कारण त्याला माहित असत इतर कुणासाठी नाही पण कितीही थकली तरी माझी लेक माझ ऐकेलच.
एका लेकीचा बाप होणं आणि बापाचं काळीज असणारी लेक होणं हे फक्त त्या बाप लेकीच्या नात्यलाच ठाऊक असत. प्रत्येकाचा अहवाल मागणार एक प्रशासकीय कार्यालय म्हणजे बाप. स्वतःच्या मनातल्या इच्छा सांगून ‘माझी अशी इच्छा आहे ‘अस करायच का? ऐवढी करशील ना?बाई हे तुझ्या हातच्या करून आणशील का? चुपचाप करशील हं? तुझ्या आईला पण नको सांगू आपल्या दोघात ही गोष्ट राहू दे ,तुझ बरोबर आहे.अस विश्वासाच व्यासपीठ लेक या नात्यात कस गाजतं ते फक्त एका लेकीच्या बापालाच माहित असतं. कारण माझ हे चुकलं यार मी अस करायला नको होत हे कबूल केल जात तेही फक्त आणि फक्त मुली समोरच. या एका अपेक्षेव्यतिरीक्त तो कुठलीच मागणी तिच्याकडे करत नाही. उलट तिच्या दिवाळीच्या उटणे घासून इवल्या हातांनी केलेली आंघोळ सासरी गेल्यावर तो कायम स्मरणात ठेऊन त्याच हातात शंभरीची नोट वर्षानुवर्षे कशी टिकवता येईल याची रोज वाट बघत असतो.
पूर्वी लोक म्हणत असत ‘पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी ‘कारण लेक काहीच करत नसली काहीच देत नसली तरी काळजाचा तुकडा असते तिच्या बापाची. जगातलं सगळं ऐश्वर्य ,सगळ सुख देणारी प्रत्येक गोष्ट त्याला त्याच्यापुढे फिकी वाटायला लागते.तिची चाहूल ,तिचा आवाज ,तिची भेट ,तिने भरवलेला घास त्याच्याकरता सर्वात मोठ धन असत.
बाप-लेकीचं नातं काही स्पेशल असंत. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर. लेक जर घराचे सौख्य असेल तर त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो. बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो, लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बाबाच असतो. आईने काही काम सांगितले तर तिला दटावणारासुद्धा बाबाच असतो. लेकीचे पहिले बोबडे बोल , तिने टाकलेले पहिले पाऊल , तिचे लाडिक वागणे, तिची घरभर पैंजणांची छुमछुम हे सगळे पाहून सुखावतो तो बाबा असतो आणि लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा आणि प्रसंगी रागे भरणारा पण बाबाच असतो. पण त्यात त्याची लेकीसाठी तळमळ असते, तिच्यासाठीची काळजी असते. लेकीला नाजूक कळीसारखे सांभाळतो आणि प्रसंगी बाबाचा धाकही असतोच. म्हणूनच म्हणतात ना, बाप-लेकीच्या नात्याला कसलीच तोड नाही. लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराहि बाबाच !!! आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बाबाच !!!
ज्या लेकीला २०-२५ वर्षे जीवाच्या पलीकडे सांभाळले तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचे हृदय काय तुटत असेल ह्याची कल्पनाही करता येणार नाही. आर्त धागे तुटल्याची ती वेदना कोणीच नाही समजू शकणार. आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जाताना पाहताना ढसाढसा रडणाराही बाबाच असतो. आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना आतून तुटणारा बाबाच असतो. “दिल्या घरी सुखी रहा म्हणताना ” मनातून खचलेलाही बाबाच असतो. असा हा बाबा त्याच्या लेकीचे सर्वस्व असतो. आणि फक्त लेकच तिच्या बाबाचे मन ओळखू शकते. लग्नानंतर मुलीचे नाव जरी बदलले तरी तिचे बाबा बरोबरचे नाते कधीच बदलत नाही. ती शेवटपर्यंत तिच्या बाबाची छोटी परीच असते. एक गोंडस परी…
खरतर सासरी गेल्यावर मुली संसार आणि सासरची कर्तव्य करण्यातच माहेर जपत असतात. तिच्यासाठी माहेर म्हणजे दुय्यम स्थान तिला वाटत नसेल तरी तिच्या कृतीतून ते सहज ठरवलं जात. कारण बाप आणि माय या दोनच नात्याला तिचा संसार म्हणजे प्रथम प्राधान्य देण हे कळत असतं. मुलीच्या डोळ्यात अश्रू न येण्यास कायम तिला सार करतांना चेह-यावरचा आनंद दाखवत दारात तिच्या पुढच्या फेरीसाठी ऊंबरठ्यावर स्वागतासाठी सज्ज असतं ते फक्त आणि फक्त बापाच काळीज….
डोळ्यात न दाखवताही
जो आभाळाइतकं प्रेम करतो
त्याला वडील नावाचा
राजा माणूस म्हणतात…
खूपच सुंदर लेख
Khup sundar lihila ahes blog, bap lekich nat khara tar asach asta. Sundar