Topic: Determine school hours at the local level, instructions given by the Commissioner of Education to the authorities due to rising temperatures
एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात उष्णतेचा कहर असतो. दुपारी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा प्रचंड होतो. उष्माघातकपासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी सरकारकडून उपाय योजना आखली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आल्याने, शालेय वेळेबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खात्री करावी, असे आदेश नशिकचे शिक्षण आयुक्त ( District Collector ) सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.तसेच अधिकाऱ्याशी चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे आदेश ही देण्यात आला आहे.
कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे शाळा उशिराने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी एप्रिल अखेर परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. काही दिवसांपासून राज्यातील काही भाग उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात आहेत. या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना करण्यात आली आहे.भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांद्रे यांनी सांगितले.
मुलांच्या आरोग्याला धोका असू शकतो: एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे शिक्षक आणि पालक संतप्त झाले आहेत. बऱ्याच पालकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. मुलांना सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत शाळेत शिकवले जाते.तेव्हा दिवसाचे तापमान 40 अंशाच्या आसपास असते. जे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. सरकारने हस्तक्षेप करून शाळेला सकाळचे काही तासच द्यावेत. अशी मागणीही काही पालकांनी केली आहे.
पुण्यातील उष्णतेच्या लाटेबाबत IMD कडून अद्याप कोणताही इशारा नाही: पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद म्हणाले की, राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि शिक्षण आयुक्तांशी चर्चा केली असून, यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या सूचनांची आम्ही वाट पाहत आहोत. ते म्हणाले की, उष्णतेची लाट आल्यास त्या मर्यादित दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेऊ शकते. IMD कडून कोणताही इशारा नसल्यामुळे, त्यांनी असा कोणताही प्रस्ताव सुरू केलेला नाही.ते म्हणाले की, शाळा सकाळी लवकर सुरू करुन दुपारपर्यंत बंद होण्याची खात्री करण्यात आली आहे.