Do your kids watch YouTube all the time? Then there are the dangers...
मोबाइल हा सध्या सर्वच वयोगटातील लोकांसाठी गळ्यातील ताईत बनला आहे. थोडा वेळ हातात मोबाइल नसेल तर अनेकांना अस्वस्थ झाल्यासारखे होते. लहान मुलेही याला अपवाद नाहीत. मोठ्यांच्याच हातात सतत मोबाइल असल्याने लहान मुलांनाही कमी वयापासूनच या मोबाइलचे आकर्षण असते, कधी गाणी बघण्याच्या नादाने तर कधी आई-वडिलांच्या मोबाइलमध्ये डोकावून पाहत मुलं मोबाइलचा वापर करतात.
काही वेळा आपल्याला थोडा मोकळा वेळ मिळावा किंवा मुलांना चांगले काहीतरी शिकायला मिळावे, या उद्देशाने यूट्यूब लावून देतो. आपण त्यांना गाणी किंवा गोष्टींचे व्हिडीओ, काही माहितीपर व्हिडीओ दाखवतो; पण काही वेळा मुलं आपल्या नकळत स्क्रोलिंग करतात आणि त्यात त्यांच्यासाठी धोक्याचे असलेले व्हिडीओ त्यांच्यासमोर येतात.
यूट्यूबवर असे अनेक व्हिडीओ क्रिएटर असतात जे विशेषतः लहान मुलांना गुंतवून ठेवण्यासाठीचे धोकादायक व्हिडीओ निर्माण करत असतात. यूट्यूबवर जगभरातील असंख्य विषयांतील व्हिडीओ मिनिटा- मिनिटाला अपलोड होत असतात आणि जगात कोणत्याही कोपऱ्यात बसून आपण ते पाहू शकतो; पण लहान मुलांनी यूट्यूबवर काय पाहावे आणि काय पाहू नये यावर पालक म्हणून आपले नियंत्रण असायला हवे. मात्र, काही वेळा आपण मुलांना मोबाइल लावून देतो आणि आपले काम करायला लागतो. अशावेळी मुलांनी मोबाइल स्क्रोल केला तर काही घातक व्हिडीओ त्यांच्यासमोर येतात आणि ते पाहिल्याने मुलांचे नुकसान होऊ शकते. हे व्हिडीओ मुलांसाठी का घातक असतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी, याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी समुपदेशक सांगतात, त्या कोणती पाहू या.
नेमक काय होतं?
यूटयूबचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे आपण ज्या प्रकारचे व्हिडीओ पाहतो, तो चॉईस लक्षात घेऊन त्याच पद्धतीचे व्हिडीओ यूट्यूब आपल्याला दाखवत राहते आणि मुनं स्क्रीनिंग करन आपल्याला हवे ते व्हिडीओ निवडू शकतात. आपले मूल आपण लावून दिलेले कार्टून पाहत आहे. असा पालकांचा अनेकदा समज होतो, पण आत्महत्या किंवा हिंसक प्रकारची काही ‘कार्टून्स क्रिएट केलेली असतात की कार्टूनच्या नावाखाली येऊ शकतात,
चुकीच कंटेंट येऊ नये म्हणून हे करा..
मुलांसमोर अनावश्यक गोष्टी येऊ नयेत यासाठी यूटयूब कीडस ॲप्लिकेशनडाउनलोड करा यूट्यूबवर येणारा कंटेंट मॅन्युअली अप्रूव्ह करा. म्हणजे मुलासमोर त्यांना पाहता येईल असाच कंटेंट येईल.