How did the expansion of McDonald’s grow?
आपल्याला कदाचित कल्पना नसेल की दिवसाला 65 मिलीयन पेक्षा अधिक लोकं मॅकडोनाल्ड मधे खातात, आणि हे वाचुन देखील तुम्ही नक्की आश्चर्यचकीत व्हाल की मॅकडोनाल्ड कंपनी प्रतिदिवशी 100 मिलीयनहुन अधिक बर्गर लोकांपर्यंत पोहोचवते! ही मॅकडोनाल्ड ची रेस्टॉरंट श्रृंखला कॅलीफोर्निया शहरातील एका छोटयाश्या परिवारातील दोन बांधवांनी सुरू केली.
“मॅकडोनाल्ड” आज जगातील प्रमुख रेस्टॉरंट पैकी एक गणल्या जाते. 1940 च्या दशकाच्या सुरूवातीला रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड यांनी ‘स्पीडी सेवा प्रणाली’ सुरू करत एक रेस्टॉरंट ची सुरूवात केली प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या या रेस्टॉरंट मधे हॅम्बर्गर तयार करून विकलं जायचं.
आजुबाजुच्या हॉटेल्समधे तासंतास वाट बघणा.या खवय्यांनी जेव्हा या स्पिडी सेवा प्रणालीला अनुभवलं त्यावेळी ते संपुर्णतः समाधानी तर झालेच पण या नव्या प्रयोगामुळे मॅकडोनाल्ड बंधुंची ख्याती देखील सर्वदुर पसरत गेली.
आता तुम्ही नक्कीच विचार कराल की यांची प्रसिध्दी झाल्यामुळे यांनी लगेच आपला व्यवसाय वाढवला असेल , हो ! असं घडलं परंतु त्वरीत नाही याला या बांधवांनी बराच वेळ घेतला. पुढे त्यांनी मॅकडोनाल्डच्या दुसऱ्या एका शाखेकरता नोंदणी केली, या दरम्यान शिकागो मधील व्यवसायी ‘रे क्रोक’ या बांधवांना दक्षिणी कॅलिफोर्नियात आपला व्यवसाय विस्तारण्याकरता सहाय्य करत होते.
1950 च्या दशकाच्या अंतापर्यंत कंपनी 9 रेस्टॉरंट मधे विस्तारीत झाली आणि वेगानं एक प्रमुख फ्रेंचायसी बनली. रे क्रोक ने या छोटयाश्या रोपटयाला पुढे खुप मोठया प्रमाणात वाढवलं. पुढच्या पन्नास वर्षात मॅकडोनाल्ड ने दहा रेस्टॉरंट पासुन प्रगती केलेला हा व्यवसाय जगभरात पसरला आणि त्याचे रूप आज आपल्यासमक्ष आहे.
मॅकडोनाल्ड चे आज जगभरात जवळजवळ 34,000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट आहेत जे आपल्या अव्दितीय चवीमुळे लोकांना बांधण्यात यशस्वी ठरलेत. मॅकडोनाल्ड चे रेस्टॉरंट इंडोनेशिया आणि मिस्र सारख्या देशात देखील आपल्या मांसाहारी विशिष्ट चवी आणि पदार्थांकरता प्रसिध्द झाले आहेत.
वेगानं विस्तारत गेलेल्या या कंपनीला विश्लेषकांच्या कौतुकाला आणि संस्कृति रक्षकांच्या रोषाला देखील बळी पडावे लागले, त्यांच्या मते मॅकडोनाल्ड कंपनी ने अश्या देशांमधे देखील प्रवेश मिळवला जे याकरता कधीच इच्छुक नव्हते.
कंपनीच्या नैतिकतेला एकीकडे ठेवले तर वैश्विक फ्रंचायसी बघता या कंपनीची सफलता निर्वीवादच आहे आणि शतकातील सर्वात यश मिळवणा.यांपैकी आजघडीला मॅकडोनाल्ड चे यश सर्वांसमोर आहे.
गेल्या काही वर्षांपासुन मॅकडोनाल्ड ने फास्ट फुड इंडस्ट्रीतील बऱ्याच गोष्टींकडे आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे विशेषतः युवापिढीला समोर ठेउन व्यंजन बनवण्यात आता ते लक्ष्य देतायेत.
1970 च्या काळात आपली नवी चव लोकांच्या जिभेवर आणुन ठेवणारा मॅकडोनाल्ड नक्कीच प्रशंसेला पात्र आहे. कॅलिफोर्नियातील एका छोटयाश्या रेस्टॉरंट पासुन मॅकडोनाल्ड ने सुरू केलेला हा प्रवास रेस्टॉरंट श्रृंखलेत बदलला आणि आज इथपर्यंत येउन ठेपला आहे हे अमेरिकेच्या सर्वात यश मिळवणा.या गोष्टींपैकी एक आहे.
कॉर्पोरेट संस्कृती पासुन ते अल्ट्रा कुशल खादयापर्यंत मॅकडोनाल्ड एक अभिनव यशापैकी एक मोठे उदाहरण होय!