Topic: How to become an elementary school teacher? Know all the information
शिक्षकाची नोकरी एक सन्माननीय काम आहे, कारण मुलांना शिक्षण देणे त्यांना घडवणे हे सोपे काम नाही, अनके लोकांना शिक्षक बनायचे असते जेणेकरून ते त्यांचे ज्ञान इतरांना देऊ शकतील आणि स्वतःचे ज्ञान वाढवू शकतील. म्हणूनच शिक्षक किंवा गुरु होणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. शिक्षक देखील अनेक टप्प्यात बनता येते, काही लोक मोठ्या मुलांचे शिक्षक बनतात, तर काही प्राथमिक शाळेतील मुलांचे शिक्षक बनतात. प्राथमिक शाळेतील शिक्षक हे सरकारी शिक्षक तसेच खाजगी शिक्षक असतात.जर तुम्हाला प्राथमिक शाळेतील शिक्षक व्हायचे असेल, तर येथे तुम्हाला प्राथमिक शाळेतील शिक्षक कसे व्हायचे याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
– सर्वप्रथम शिक्षक होण्यासाठी उमेदवाराला बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शिक्षक होण्यासाठी उमेदवार कला, वाणिज्य किंवा विज्ञान कोणत्याही विषयातून 12वी उत्तीर्ण होऊ शकतो.
– 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर, जर तुम्ही कला शाखेतून बारावी केली असेल, तर बारावीनंतर बी.ए करून पदवी पूर्ण करू शकता आणि जर तुम्ही वाणिज्य शाखेत बारावी केली असेल, तर बी.कॉम, बीबीए सारखे अभ्यासक्रम करून पदवीचे शिक्षण पूर्ण करू शकता. जर तुम्ही विज्ञान शाखेसह 12वी उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही बीएससी सारख्या अभ्यासक्रमासह पदवी पूर्ण करू शकता.
– पदवी पूर्ण केल्यानंतर, तुमच्याकडे बी.एड पदवी असणे आवश्यक आहे. बीएडचा अभ्यासक्रम २ वर्षांचा असतो. सरकारी शिक्षक होण्यासाठी बीएड करणे अत्यंत आवश्यक मानले जाते.
– सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षक होण्यासाठी तुम्हाला बीएड नंतर TET परीक्षेत यश मिळणे आवश्यक आहे कारण TET परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तुम्ही प्राथमिक शिक्षक होऊ शकत नाही आणि तुम्हाला खाजगी शिक्षक व्हायचे असेल तर TET शिवाय प्राथमिक शाळांमध्ये अर्ज करू शकतो.
ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, जेव्हा-जेव्हा शिक्षक भरतीसाठी सरकारी अर्ज जारी केला जातो. तेव्हा तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. जोपर्यंत सरकारी शिक्षक भरती होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही खाजगी शाळेत शिकवण्यासाठी अर्ज करू शकता.