S R Dalvi (I) Foundation

शिक्षकांवरील खास मराठी सुविचार

Topic : Marathi Quotes on teachers

आपल्या आयुष्यात या गोष्टी आपल्याला आई- वडिलांपासून तर मिळतातच पण या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची व्यक्ती आपल्याला या गोष्टी शिकवत असते ती व्याक्ति म्हणजे ‘शिक्षक’. आई वडिलांबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान देण्यासह चांगले संस्कार एक शिक्षक देत असतो. एक व्यक्ति, विद्यार्थी घडवण्यामागे त्यांच्या आईवडीलांसह मोठी जबाबदारी शिक्षकावर असते. शिक्षकांचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत. आज पाहूयात शिक्षकांचे कौतुक करणारे, आभार मानणारे कही सुविचार.
शिक्षकांवर सुविचार                                            

शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे, जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता.

शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो,
तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो.

स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते, तोच खरा शिक्षक !”

 चिखलातला जन्मही सार्थकी लावावा
निसर्गासारखा शिक्षक प्रत्येकाला मिळावा 

आजचे शिक्षक भावी पिढीचे रक्षक 

शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे
आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.

स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक!

Scroll to Top