S R Dalvi (I) Foundation

३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी 5 टॉप ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म

Topic: Top 5 online learning platforms for kids

आजच्या लेखात, मी तुम्हाला मुलांसाठी ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मबद्दल सांगणार आहे. जिथे 3 ते 12 वर्षे वयोगटातील मुले लॅपटॉप किंवा मोबाईल फोनद्वारे घरी बसून सर्व विषयांचा अभ्यास करू शकतात. जेव्हापासून कोरोना या देशात दाखल झाला आहे तेव्हापासून ऑनलाइन गोष्टींची मागणी जास्त वाढू  लागली आहे. मग त्यात ऑनलाइन शिक्षण ही घेणे आणि देणे ही वाढू लागले आहे.ऑनलाइन प्लॅटफॉर्मची स्वतःची वैशिष्ट्ये आणि काही कमतरता देखील आहेतच. सर्व ऑनलाइन ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर वेबसाइट्स आणि अॅप्लिकेशन्स देखील आहेत. ज्यामुळे लहान मुलांसाठी अगदी मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून शिकता येते. पाहूयात लहान मुलांसाठी ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म.  

Whitehat Jr:
Whitehat Jr  हे एक ऑनलाइन ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. केवळ लहन मुलांना या प्लेटफार्म चा फायदा होऊ शकतो.  या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन कोडिंग शिकण्यास मिळते. प्रत्येक पालकाला त्याच्या पाल्याला तांत्रिक शिक्षणही द्यायचे असते. याचाच विचार करुन  येथे मुलांना थेट वर्ग दिले जातात ज्यात मुलांना coding, app development, web designing  अशा बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात. व्हाईटहॅट जूनियर वर सर्व गोष्टी प्रॅक्टिकल करून अतिशय सोप्या पद्धतीने शिकवले जाते जेणेकरून मुलांना  ते आनंददायी पद्धतीने शिकता येते .
वेबसाइट लिंक :- www.whitehatjr.com 

Vedantu 
Vedantu खूप लोकप्रिय ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. येथील बहुतेक शिक्षक भारतातील आहेत आणि इथे लेक्चर व्हिडिओद्वारे शिकवले जातात. तसेच यूट्यूब व्हिडीओद्वारे लाईव्ह क्लासेस देखील दिले जातात. याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एक व्हर्च्युअल क्लासरूम तयार करण्यात आली असून त्यात सामूहिक शिक्षण दिले जाते. या व्यासपीठावर लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्वांनाच शिकवले जाते. 
वेबसाइट लिंक :- www.vedantu.com 

Diksha App (A Government Of India E- Learning App For Kids) 
भारत सरकारने लहान मुलांसाठी दीक्षा अॅप नावाचे ई-लर्निंग अॅप सुरू केले होते. येथे सर्व वर्गातील विद्यार्थी ncert आणि cbse बोर्डाशी संबंधित सर्व प्रकारचे अभ्यास साहित्य विनामूल्य मिळवू शकतात. हे भारत सरकारचे अॅप आहे, त्यामुळे ते पूर्णपणे मोफत आहे.

Funbrain 
हे एक ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, जिथे लहान मुले मनोरंजक पद्धतीने अभ्यास करतात. येथे मुलांना पारंपारिक पद्धतीने शिकवले जात नाही, तर अभ्यासात  गमती जमती करून मुलांना शिकवले जाते. लहान मुलांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हे ऑनलाइन किड्स प्लॅटफॉर्म एक अतिशय चांगले व्यासपीठ आहे.
वेबसाइट लिंक:- www.funbrain.com The

PowerKid 
हे खूप चांगले ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आहे ही कंपनी इतर देशांमध्येही काम करू लागली आहे. येथे इंग्रजी, गणित, विज्ञान तसेच वाचन आणि गृहपाठ मदत दिली जाते. हे एक सशुल्क प्लॅटफॉर्म आहे. येथे 80 पेक्षा जास्त विषय शिकवले जातात.
वेबसाइट लिंक:- www.powerkid.com

Scroll to Top