Topic: Here are some of the most frequently asked questions about teachers
शिक्षक हे विद्यार्थ्याच्या जीवनातील एक अशी महत्वाची व्यक्ती आहे जी आपल्या ज्ञानाने, संयमाने, प्रेमाने आणि काळजीने त्याच्या संपूर्ण आयुष्याला मजबूत आकार देते. आपल्या आयुष्यात असे काही प्रश्न आहेत जे आपल्याला कधीतरी विचारले गेले असतील किंवा आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे माहित असणे गरजेचे आहेत.
वाचा असे काही वारंवार विचारले जाणारे निवडक प्रश्न:
प्रश्न १ – शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर -शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी ‘शिक्षक दिन’ जो 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
प्रश्न २ – शिक्षक आपल्यासाठी महत्त्वाचे का आहेत?
उत्तर– शिक्षक मुलांना जीवनात चांगले काम करण्यास प्रवृत्त करतात.
प्रश्न 3 – भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या?
उत्तर – सावित्रीबाई ज्योतिराव फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या.
प्रश्न 4 – अलीकडे कोणत्या भारतीय शिक्षकाला पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर – नुकतेच रणजित सिंग देसले यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड 2020 ने सन्मानित करण्यात आले आहे.