Topic: Marathi Poem On teachers
शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो,
ज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे
ज्ञानाची पानं
त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते
अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या
अस्फुट चित्कांरांना
किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी
लटकेली असतात
कित्येक भावनांच्या डोहात भिजून
नतमस्तक झालेली इवालाल्या चेहऱ्याची
निरागस अक्षरे
शिक्षक नसतो कधीच बिचारा
तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा
त्याच्याच स्वमीत्वाने महत्व येत असते शाळेला
तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ
नखशिखान्त अंधर भरलेल्या चिमूकल्या गोळ्यातून
सूर्याचं तेज बाहेर काढणारा
तो समाज सुधारक क्रांती कारकही तोच
कित्येक चेतनांना पाठबळ असते
त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे
शिक्षकाला जपावी लागतात
कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाड
आणि आकार द्यावा लागतो
एका मुक्त पणे बागडणाऱ्या
निराकार चैत्यनाला…
कधी स्वतःला विसरून बागडावं ही लागतं
जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आत
निर्ममपणे…
कधी अंधाअ ही प्यावा लागतो बोनबोभाट पणे
तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं उद्दीष्टांच्या वाटेवर
त्याच्या सोबतील असतेच की खडूची धारदार तलवार अन
फळ्याची ढाल असते पाठीशी
विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल.
अन तेंव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल…