‘To all the buds’
‘ज्ञानपीठ’ पारितोषिक विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांची “साऱ्याच कळ्यांना” म्हणजे सर्व स्तरातील, घरातील, जाती-पातीतील देश-विदेशातील ‘पाल्यांना’ फुलण्याचा, बहरण्याचा अधिकार असतो. हे त्यांनी या कवितेत अचूक मांडले आहे. त्यासाठी त्यांनी ह्या कवितेत विविध प्रतिमांचा अचूक वापर केला आहे. कळ्यांना वाढविण्यासाठी, फुलविण्यासाठी, वेलींच्या मुळांना जमिनीत खोल जावे लागते. कळीच्या निरोगी, टवटवीत वाढीसाठी जमिनीतून सकस अन्न, पाणी व वातावरणातून हवा, उजेड व सूर्यप्रकाश इ. बरेच काही त्या वेलींना घ्याव लागते. अगदी तशीच भूमिका तुम्हा पालक पती पत्नीची असते. त्यासाठीच ही कविता.
‘साऱ्याच कळ्यांना’
“साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा ।
मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा ॥१॥
जन्म असो माळावरती, अथवा शाही उद्यानात |
प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा ॥२॥
गुलाब असो, कमळ असो, कळी असो गटारातील |
तिच्यासाठी तिष्ठत असतो, एक किरण सूर्याचा ॥३॥
प्रत्येक कळीत जगत असतो, निर्धार फूल होण्याचा |
दिमाखाने दिसण्याचा अनु सुगंधाने असण्याचा ॥४॥
तुम्ही पालक कोणत्याही आर्थिक स्तरातले असा कोणताही उद्योग-धंदा व्यवसाय करीत असा. तुमच्या सर्वांच्या जगण्याता खूप मित्रता असली तरीही तुम्हाला तुमच्या पाल्यांना वाढवावे लागते. घडवावे लागते. त्यासाठी तुम्हा पती-पत्नीला परिणामकारी सुजाण पालकत्वाची भूमिका पार पाडावीच लागते. तुमच्या नित्याच्या जीवन जगण्यात तुमच्या मुला-मुलीसंबंधीच्या काही मूलभूत गोष्टीना गांभीर्याने प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासंबंधात डोरोथ एन् नॉल्ट यांची कविता तुम्ही पालक पती-पत्नीने लक्षात ठेवावयास हवी. त्यावर चिंतन-मनन प्रत्यक्ष कृती करावयास हवी.
जेव्हा तुमची मुलं टीका झेलत झेलत वाढतील,
तेव्हा ती प्रत्येक गोष्ट नाकारण्याच्या वृत्तीची बनतील ॥१॥
जेव्हा तुमची मुलं विरोध सोसात-सोसत वाढतील,
तेव्हा ती अनेक बाबतीत भांडखोर बनतील ||२||
जेव्हा तुमची मुलं उपहासाचा विषय बनतील,
तेव्हा ती हमखास भित्री आणि बुजरी बनतील ||३||
जेव्हा तुमच्या मुलांना स्वतःबद्दल लाज वाटते,
तेव्हा त्यांच्या मनात अपराधाची भावना घर करते ||४||
जेव्हा तुमची मुलं सहनशील बनतील,
तेव्हा त्यांच्या अंगो चिकाटी रुजेल ||५||
जेव्हा तुमची मुलं प्रामाणिक वागायला लागतील,
तेव्हा ती इतरांशीही न्यायबुद्धीने वागल ||६||
जेव्हा तुमची मुलं सुरक्षित वातावरणात वाटतील,
तेव्हा ती इतरांवर विश्वास टाकतील ||७||
जेव्हा तुमचं मुल लहान-सहान कौतुकं झेलतील,
तेव्हा ती स्वतःवर प्रेम करू लागतील ||८||
जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना आनंदानं स्वीकाराल,
तेव्हा ती आनंदी राहतील. ||९||
जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना मैत्रीनं वाढवाल,
तेव्हा तिही मैत्रीने वागू लागतील ||१०||
जेव्हा तुम्ही छोटा-छोट्या गोष्टीत आनंद शोधाल,
तेव्हा तेही प्रत्येक गोष्टीत आनंद शोधतील. | |११| |