What is Agneepath Yojana?
भारतातील तरुणांना आता चार वर्षासाठी सैन्यात भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची अग्निपथ योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निविर असं म्हटलं जाणार आहे.
राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांसह अग्निपथ योजनेचा शुभारंभ केला. भारतीय सैन्याला जगातील सर्वश्रेष्ठ सेना बनवण्यासाठी सीसीएअंतर्गंत एक निर्णय घेतला आहे. अग्निपथ योजनेअंतर्गंत तरुणांना अग्निवीर म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे. देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि देशातील युवकांना सैन्यात भरती करण्यांच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात येत आहे.
अग्नीपथ योजनेमुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि सैन्यातील कौशल्य अनुभव यामुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आपल्या देशासाठी उत्सव कौशल्याचे मनुष्यबळ उपलब्ध होईल तसेच उत्पादकता वाढेल जीडीपी वाढण्यास मदत होईल. असे खूप सारे फायदे अग्निपथ योजनेचे आहेत.
1) अग्नीपथ योजना देशातील तरुणांसाठी देश सेवा करण्याकरिता संधी उपलब्ध करून देत आहे.
2) देशातील तरुणांना अग्नीपथ योजनेअंतर्गत सैन्यात चार वर्षासाठी देशसेवा करता येणार आहे.
3) अग्निपथ योजने अंतर्गत भरती झालेल्या सैनिकांना अग्निविर असे संबोधले जाणार आहे.
4) चार वर्षानंतर अग्नी वीरांना निवृत्त केले जाईल. तसेच या अग्नी विराम मधून 25% पुन्हा आर्मी भरती साठी आरक्षण दिले जाणार आहे याच्यातून 25% टक्के तरुण पुन्हा सेवेत घेता येतील त्याच्यासाठी अग्नी वीरांना पुन्हा सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
अग्नीपथ योजनेअंतर्गत भरती झालेले तरुणांनी जर का देशासाठी बलिदान दिलं तर त्यांना विम्याची मदत दिली जाणार आहे त्यांना 44 लाखाचा विमा वीरगती प्राप्त झाल्यास मिळणार आहे. तसंच अग्नी वीराच्या कुटुंबाला एक कोटीची आर्थिक मदत आणि संपूर्ण सेवा निधीचा लाभ दिला जाणार आहे.
अग्नीपथ योजना 2022 फायदे :
1) सशस्त्र दलाच्या भरतीमध्ये खूप मोठी सुधारणा होईल
2) तरुणांना देशाची सेवा करण्याची आणि राष्ट्र उभारण्याची अग्नीपथ योजनेअंतर्गत संधी मिळेल.
3) अग्निपथ योजनेमुळे सशस्त्र दलाची प्रगती आणि तरुणांची प्रगती गतिमान राहिली.
4) भारतातील तरुणांना नोकरीची संधी मिळेल तसेच देशाची सुरक्षा उंचावेल.
5) अग्नीपथ योजनेमुळे अग्नी वीरांना सर्वोत्तम संस्थांमध्ये प्रशिक्षण तसेच कौशल्य वाढवण्याची संधी मिळेल.
6) अग्नीपथ योजनेमुळे नागरी समाजात लष्करी नैतिकता तसेच चांगल्या शिस्तबद्ध आणि कुशल तरुणांची वृद्धि होईल.
“अग्निपथ ” योजना उद्देश व वैशिष्ट्ये :
अग्निपथ योजनेअंतर्गत भारत सरकारने आपली सुरक्षा दल वाढवण्यासाठी ही रणनीती आखली आहे. निवडक अग्नि वीराना जम्मू आणि काश्मीर सिमे सारख्या प्रदेशात पाठवण्यापूर्वी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. म्हणजे जम्मू आणि काश्मिर सारख्या भागात सुरक्षा अजून जास्त वाढेल.
अग्नीपथ योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या तरुणासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा होणार नाही. अग्निपथ योजना अंतर्गत नोंदणी करणाऱ्या तरुणांना व्यावसायिक म्हणून सहस्र सेवांमध्ये भरती होण्यासाठी तयार होण्यासाठी केवळ तीन कार्यकाळात साठी किमान दोन वर्षे प्रभावीपणे प्रशिक्षण कालावधीत घेऊन जाणे आवश्यक राहणार आहे.
अग्नीपथ योजनेसाठी पात्रता :
1) उमेदवाराचे वय 17.5 ते 21 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल
2) मान्यताप्राप्त मंडळाने त्यांना प्रामाणिक करणे आवश्यक आहे.
3) उदाहरण म्हणून : जनरल ड्यूटी शिपाई मध्ये भरती होण्यासाठी शिक्षण पात्रता किमान दहावी पास असणे आवश्यक राहील
ज्या तरुणांची इच्छा आहे की देशासाठी काम करावे देशाची सेवा करावी अशा सर्व तरुणांना अग्निपथ योजना मोलाची ठरणार आहे दरवर्षी मोठ्या संख्येने अर्जदार भारतीय सैन्य भरतीसाठी अर्ज करतात आणि भारतीय सशस्त्र दलाचे सदस्य होण्याची इच्छा बाळगतात. अजून सुद्धा खूप असे करुन आहेत की ज्यांनी भारतीय सैन्यदलात जाऊन त्यांची भरती झालेली नाही. अशा तरुणांना अग्नीपथ योजना संधी देणार आहे.