What is ChatGPT? How does it work?
इंटरनेट वर सध्या ChatGPT ची फार वेगाने चर्चा होत आहे. पुष्कळ लोकांसाठी ChatGPT एक उत्कृष्ठ tool आहे, तर खूप लोकांसाठी एक भीती च कारण सुद्धा. ChatGPT हे Google search ला देखील टक्कर देऊ शकत असे सांगितले जाते. पण पुष्कळ लोकांना हा प्रश्न पडलाय कि नेमक ChatGPT आहे काय, आणि त्याचा वापर कसा करावा? तर ChatGPT म्हणजे नेमक काय, आणि ह्याचा वापर कश्यासाठी केला जातो, आणि ह्याचा वापर कसा करावा?
आपण आधी Google search तर वापरलंच असेल आपल्याला इंटरनेट वर काही search करायचे असले कि आपण सहज Google वर जाऊन search करतो. पण Google वरती search केल्यावर तुम्हाला फक्त लिंक्स मिळतात, आणि माहिती मात्र आपल्याला जाऊन जाऊन शोधावी लागते. विचार करा कि तुम्ही काही प्रश्न विचारला, आणि थेट तुम्हाला त्या प्रश्नांच उत्तरच मिळाल तर किती छान व्हायच ना? अश्या वेळेवर ChatGPT तुमचा मददगार बनून येतो.
What is ChatGPT? – ChatGPT म्हणजे काय?
ChatGPT एक Artificial Intelligence tool आहे, ज्याला OpenAI ह्या कंपनी नी बनवले. असं समजा कि ChatGPT एक chat bot आहे, जो आपलं बोलणं समझून घेतो, आणि त्यानुसार मग काम करतो. तुम्ही ChatGPT चा वापर खूप गोष्टींकरिता करू शकता, जस कुठल्या प्रकार ची माहिती काढणे, लेख लिहणे, कोडींग करणे, प्रश्नांची उत्तर देणे, सहजच बोलणे, आणि बरेच काही.
तुम्ही ChatGPT सोबत बोलल्यावर तुम्हाला कदाचित असे हि वाटेल कि जणू काही कोणी व्यक्ती च आपल्यासोबत बोलतोय, पण तस नाहीये. Technology मध्ये होणाऱ्या प्रगती चा ChatGPT हा एक खूप मोठा हिस्सा आहे, व खूप लोक ChatGPT चा वापर पुष्कळ प्रकारे करतात, व आपला पुष्कळ वेळ वाचवतात.
उदाहरणासाठी, जर तुम्ही ट्रिप प्लॅन करताय ते हि पॅरिस ची, पण तुम्हाला अगदी लवकर हे जाणून घ्यायचय कि पॅरिस मध्ये कुठल्या ठिकाणी फिरायला जायला हवं, तर तुम्ही सहज ChatGPT ला असं विचारू शकता जस तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बोलता – “What are the must-visit attractions in Paris?”, आणि ChatGPT तुमच्यासमोर उत्तर घेऊन येईल. ते तुम्हाला त्या जागा सांगेल जिथे तुम्ही जायला हवे, आणि जे इतर टुरिस्ट प्लेसेस आहेत त्या देखील.
हे तर फक्त एक उदाहरण झालं. असे अनेक कामांमध्ये ChatGPT आपली खूप मदत करू शकतो, आणि आपला वेळ आणि पैसे दोन्ही वाचवू शकतो.
असं ही म्हटलं जात कि ChatGPT व इतर AI tools मुळे पुष्कळ नौकऱ्या जाण्याची देखील भीती आहे, पण तिथेच ह्यांच्यामुळेच नव्या नौकरीच्या संधी देखील मिळतील. पुष्कळ लोक ChatGPT च्या येण्याने त्रासले आहेत, पण इतर लोक ChatGPT चा वापर करून अशक्य वाटत असलेलं काम शक्य करू शकत आहेत.
ChatGPT full form काय? – Chat GPT Full Form
ChatGPT मध्ये GPT म्हणजे “Generative Pre-Trained Transformer”. आता ह्याला तुम्ही असं समझु शकता कि जेव्हा तुम्ही Google वरती काही search करता, तेव्हा तुम्हाला अनेक websites च्या लिंक पाहायला मिळतात, आणि माहिती मात्र आपल्याला जाऊन जाऊन शोधावी लागते. पण ChatGPT मध्ये असं नाही होत. जस तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बोलता, तसेच ChatGPT सोबत बोलाल, आणि ChatGPT तुम्हाला थेट उत्तर देईल. तुम्ही ChatGPT चा वापर स्टोरी लिहण्याकरिता, निबंध लिहण्याकरिता, माहिती काढण्याकरिता देखील करू शकता.
Chat GPT चा उपयोग – Chat GPT Uses
ChatGPT – तुमचा Personal Assistant
तुम्ही मोठे मोठे लोक पहिले असतील. त्यांच्यासोबत त्यांचे Personal Assistant देखील असतात. त्यात तुम्हाला देखील असं जर वाटत असेल, कि आपल्यासोबत हि असं कोणी personal assistant असावा, जो आपले काम करेल, तर ChatGPT हा तुमचा Personal Assistant सारखा समजला जाऊ शकतो.
होय, ChatGPT हा तुमचा personal assistant देखील समझला जाऊ शकतो. ChatGPT कधी हि, २४ तास, ७ हि दिवस तुमच्या मदतीसाठी हजर असेल. तुम्हाला जेव्हा काही प्रश्न विचारायचेत, काही माहिती हवीये, तुम्हाला कश्याची रेसिपी जाणून घ्यायचीय, कोणाला ई-मेल लिहायचं, किंवा सहजच बोलायचय, ChatGPT नेहमी तयार असतो. आम्ही देखील पुष्कळ कामांकरिता ChatGPT चा वापर करतो, आणि हे तर नक्कीच आहे कि ChatGPT मुळे पुष्कळ कामं सोप्पे झालेत, वेळ देखील वाचतो, अशे काम करू शकतो, जे पहिले जमायचे नाही, ज्यांना वेळ लागायचा, आणि जीवन सोप्पं झालंय.
ChatGPT चा वापर शिक्षणाकरिता देखील केला जाऊ शकतो.
होय, ChatGPT चा वापर शिक्षणाकरिता देखील केला जाऊ शकतो. तुम्हाला जर कुठल्या विषयाबद्दल माहिती हवीये, तुम्ही अगदी सहज ती ChatGPT ला विचारू शकता, आणि ChatGPT तुम्हाला ती माहिती देईल. इतकंच नाही, तर ChatGPT ला तुम्ही म्हणू शकता कि हीच माहिती मला लहान मुलाला सांगशील तशी सांग, आणि ChatGPT तुम्हाला अगदी सोप्प्या भाषेत माहिती देईल.
उदाहरणाकरिता, जर तुम्हाला Artificial Intelligence काय आहे ह्याबद्दल जाणून घ्यायचाय, ते हि अगदी सोप्प्या भाषेत, तर तुम्ही ChatGPT ला विचारू शकता कि Artificial intelligence बद्दल असं समझवून सांग, जस एक १० वर्षाच्या मुलाला समझवशील, आणि ChatGPT तुम्हाला सोप्प्या भाषेत समझवून सांगेल. ह्यामुळे अभ्यास देखील खूप सोप्पं होईल, ते हि समझेल अश्या पद्धती ने.
ChatGPT सर्वांसाठी आहे – Who Can Use Chat GPT
आतापर्यंत तुम्ही हे वाचल कि ChatGPT चा वापर तुम्ही माहिती काढण्याकरिता, अभ्यासाकरिता, बोलण्याकरिता करू शकता, पण ChatGPT आणखी अनेक कामांकरिता वापरला जाऊ शकतो. जस इंटरनेटवर वर लेख लिहणाऱ्यांना जर एक लेख लिहण्यामागे अर्धा दिवस जायचा कामाचा, तर ChatGPT मुळे तोच वेळ आता काही मिनिटांवर आलाय, फक्त त्याचा वापर करता यावा, तर आपला पुष्कळ वेळ वाचू शकतो. किंवा एका IT कंपनी मध्ये कुठला software किंवा program बनवायचा म्हणलं कि अनेक दिवस, कधी महिने हि लागायचे, पण ChatGPT चा वापर करून अगदी काही मिनटात किंवा काही तासात, किंवा फार तर एक दोन दिवसात तुमच काम होऊन जात .
IT Industry मध्ये देखील अनेक अशे काम आहे जे ChatGPT अगदी सहज करू शकतो, जे आज माणसं करतायेत. तुम्ही ऐकलं असेल कि ChatGPT आणि इतर AI tools मुळे नौकऱ्या जाण्याचा धोका आहे. हा फक्त IT industry पर्यंत सीमित नाही, बाकी Industries मध्ये सुद्धा AI मुळे नौकऱ्या जाण्याचा धोका असू शकतो. पण तिथेच ChatGPT आणि इतर AI tools मुळे नवीन नौकरीच्या संधी देखील पुढे मिळू शकतात.
ChatGPT वापरून आपल्याला समजत कि Machine किती चांगल्याने आता अगदी मनुष्यासारख बोलतेय. काही वेळ पूर्वी हे फक्त चित्रपटामध्येच शक्य आहे असं वाटायचं, पण आज ते जगभरात करोडो लोक वापरतायेत. तुमच्या माहिती साठी, ChatGPT ला १ मिलियन users पर्यंत पोहचण्यासाठी फक्त ५ दिवस लागले, जेव्हा Instagram ला २.५ महिने, आणि Netflix ला ३.५ वर्ष लागले.
तुम्ही जर ChatGPT वापरून पाहिलं नसेल, तर एकदा वापरून बघा. ChatGPT फक्त IT मधील लोकांसाठी नाहीये, तर सर्वांसाठी आहे, आणि अनेक कामांमध्ये ChatGPT तुमची खूप मदत करू शकतो.