Topic: What is required to become an Online Tutor and how much can you earn?
कोरोनाच्या काळात संपूर्ण जग थांबले होते. मुलांच्या शिक्षणापासून ते अगदी सर्व कार्यालयीन काम ऑनलाइन व्हायला लागली. यकाळात जास्त कसरत करावी लागली ते अर्थात शिक्षकांची. 50 – 60 विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्याची सवय असणाऱ्यांना अचानक मोबाईल आणि लॅपटॉप च्या स्क्रीन वर शिकवण्याची वेळ आली. मात्र आता २ वर्ष ऑनलाइन शिकवल्यामुळे आता ऑनलाइन शिकवण्याची मागणी खुप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बरेच शिक्षक आता ऑनलाइन शिकवण्याच्या संधी शोधत आहेत. तुम्हाला ऑनलाइन शिकवायचे असेल, या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर तुम्हाला या क्षेत्राचे भरपूर ज्ञान असायला हवे.
भारतीय ऑनलाइन शिक्षणात कमाई करण्यासाठी, प्रत्येक विषयाचे ज्ञान असणे आवश्यक नाही, परंतु जर तुम्हाला एखाद्या विषयाचे खूप सखोल ज्ञान असेल तर ते तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे.जर तुम्हाला ऑनलाईन ट्युटोरिंगचे काम सुरू करायचे असेल, तर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असणे आवश्यक आहे. यानंतरही, तुमच्याकडे खूप चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. मग जर तुम्हाला ऑनलाइन शिकवणीचे काम करून पैसे कमवायचे असतील, तर विश्वसनीय वेबसाइटला भेट देऊन, तुम्ही तेथे तुमचे खाते तयार करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचे काम सुरू करू शकता.
ऑनलाइन ट्यूटर भारतात किती कमाई करतात?
ऑनलाइन शिक्षण हे भारतातील नोकरीचे एक चांगले माध्यम बनले आहे. यामध्ये काम करणाऱ्या अनेक शिक्षकांचे उत्पन्न लाखोंचे आहे. पण असे काही आहेत ज्यांना खूप कमी पैसे मिळतात. यामध्ये प्रत्येकाला त्यांच्या गुणवत्तेनुसार पैसे दिले जातात. गुगलच्या संशोधकांच्या मते, जे शिक्षक ऑनलाइन शिकवतात त्यांना दरमहा सुमारे 10,000 ते 10,00,000 पगारमिळवता येऊ शकतो.गुणवत्तेनुसार दिलेले पैसे कोणाला किती मिळणार हे निश्चित नाही. ऑनलाइन अध्यापनासाठी शिक्षकाच्या विशेष किंवा अनुभवाच्या आधारे वेतन निश्चित केले जाते.