गेल्या २ वर्षांपासून कोरोना विषाणू अक्षरशः सगळ्यांचेच जनजीवन विस्कळीत करुन ठेवले. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर हळूहळू राज्यावर लावण्यात आलेले निर्बंध उठवण्यात आले. मात्र राज्यातील शाळा सुरु होण्यास काही मुहूर्त मिळत नव्हता.अखेर महाराष्ट्रातील बहुतांश शाळा 1 डिसेंबरपासून आणि मुंबईत 15 डिसेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात आल्या. परंतु शाळा पुन्हा एकदा बंद होऊ शकतात अशी चर्चा आता सुरु झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील शाळा तीन ते चार तासांच्या शिफ्टमध्ये सुरू आहेत आणि कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना गटात बोलावण्यात येत आहे.मात्र शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा बंद होणार की नाही यावर वक्तव्य केले आहे. ‘ओमायक्रॉनची भीती जरी असली तरी राज्यातल्या शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचं’ शाालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. ऑनलाईन-ऑफलाईन दोन्ही माध्यमातून शिक्षण सुरुच राहील, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. एखाद्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळले तर काय करायचे हे स्थानिक प्रशासन ठरवेल, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे महाराष्ट्रातील शाळा बंद होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत सध्या कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. ओमिक्रॉन प्रकरणे वाढत आहेत, पुन्हा शाळा बंद करण्याची मागणी होऊ शकते. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असे गायकवाड म्हणाल्या आहेत.
म्हणजेच ओमिक्रॉन चा धोका वाढला तर शाळा बंद होतील हे नाकारता येत नाही.